Featured

स्नेहतरंग

असंच काहीसं होत जातं मनात… फक्त वाऱ्याची झुळूक यावी आणि सळसळून उठावं काहीतरी आत…. घेऊन यावेत असंख्य विचार त्रिज्या वाढवत नेणारे… कधी शांतपणे तर कधी प्रचंड उलाढाल हृदयात… असंच काहीसं होत जातं मनात….

 

DSC05143.JPG

Advertisements

‘तू मुलगा असतीस तर बरं झालं असतं….’

हे किंवा अशा अर्थाचं वाक्य आतापर्यंत अनेकदा कानावर आलेलं आहे. त्याचं काय आहे, की मी मुलगी आहे; त्यातही भारतीय… म्हणजे भारतात मुलगा-मुलगी असणं हे दुसऱ्यांच्या सोयीनुसार असतं किंवा असावं की काय असंही वाटायला लागलंय एव्हाना! आणि म्हणूनच ‘तू मुलगा असतीस तर….’ हे वाक्य तसं कानवळणी पडलेलं (मेंदुवळणी नाही अजून!)… कधी कधी सहज म्हणून स्वतःशी मनात बोलले असेन कदाचित पण अगदीच छोटा स्व-संवाद म्हणून. आणि मुलगी असल्यामुळे तसं बिघडलं काहीच नाहीए ना.

पण इतर कोणी “तू मुलगा असतीस तर…..” याचा उच्चार केला की घडणारा संवाद जरा वेगळा असतो…

त्याचाच हा एक भाग!

झालं असं की आम्ही रिक्षाने प्रवास करत होतो. एकूण पाच जण. 3 जण मागे आणि 2 जण पुढे. मागच्या सीटवर मी-काकी-एक मित्र अशा क्रमाने डावीकडून उजवीकडे तर, पुढे मित्र-रिक्षावाला-मित्र अशी स्थिती. नेहमी-नेहमी रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना खचितच माहित असेल की, रिक्षावाल्याच्या बाजूच्या सिटा म्हणजे फक्त बुड टेकवता (आणि शेकवता) येईल अशी जागा! आमचा प्रवास होता चांगला अर्ध्या तासाचा. त्यात पुढे बसलेल्यांपैकी एक मित्र काडी होते ते बसले ठीकठाक! पण दुसरे मित्र जरा बॉडी होते त्यांना होत होता त्रास! 

आम्ही मागचे फार सुखात बसलेलो अशातला भाग नाही, कारण मी वगळता बाकीचे दोघे तब्येतीने तसे ‘बरेच’ होते (त्यात भर म्हणजे आपले अतीव सुंदर रस्ते!). तरीही पुढच्यांपेक्षा नक्कीच बऱ्या अवस्थेत आम्ही होतो आणि पुढच्यांची अबदा बघून वाईटही वाटत होते. त्यातच आमचा सुसंवाद घडायला सुरुवात झाली.

मी: खरं तर मीच पुढे बसायला हवं, तुम्हाला फार त्रास होतोय का हो? (सगळ्या जगाची काळजी आम्हाला लागलेली असतेच… कधी-कधी बोलायची हिंमत होते म्हणायचं.)

पुढचा मित्र: नाही हो… (आम्ही तसे पहिल्यांदाच भेटत होतो त्यामुळे…. अहो असं आदराने एकमेकांना म्हणणं हे आलंच). ठीक आहे मी. (हे वाक्य बोलताना त्यांच्या मनात काय-काय चालू असेल त्यांनाच माहिती.)

मी: रोडवर खड्डे पण जरा जास्तच आहेत ****… (हे असे विषय गप्पांना कसे तासनतास पुरतात.) 

पण तेवढ्यात विषय न वाढवता काकी बोलायला लागल्या…

काकी: तू ना मुलगा हवी होतीस…..

मी: (घ्या! आता हे कशाला मधेच… चांगला ‘रस्ते’ हा विषय सोडून लिंग-भेदावर चर्चा वळली. माझा तसा फार जिवलग विषय तो… त्यामुळे आपसूक मी ही बोललेच.) का? (चेहरा जरा लांबट)

काकी: अगं, म्हणजे ते मागे बसले असते ना! आणि तुला पुढे बसता आलं असतं. तुला काय कमी जागेत पण चालून जाईल.

मी: (वाह वाह, याचीच वाट बघत होते मी!) पण काकी, मी तर आता सुद्धा पुढे जाऊन बसू शकते. बारीक तर मी आहेच की! 

काकी: हो, पण आपल्याकडे असं चालत नाही ना!

मी: म्हणजे? चालत नाही म्हणजे? बाजूलाच तर बसायचं आहे.

काकी: हो, पण रिक्षावालेच मुलींना पुढे बसवून घेत नाहीत ना!

मी: म्हणजे प्रॉब्लेम मी मुलगी असण्याचा नाही तर रिक्षावाल्यांचा स्वतःचा आहे… त्यासाठी मी कशाला मुलगा असायला हवं? 

बारिश और बचपन

बारिश अजीब है, बचपन याद दिलाती है.

WP_20150816_09_33_11_Pro.jpg

जब बेजान सी धरती से पहली-दूसरी बारिश के बाद नन्हे-नन्हें हरे पत्ते ऊपर की ओर झांकते है… बचपन के दिन मेरी यादों में खिलखिला उठते है…

बारीश की बुंदे फिसलते फिसलते इन पत्तों पर अटक जाती है… कहीं से सूरज की किरन आती है खुदका चेहरा निहारती है और ये फिसलती-रुकती बुँदे सुनहरा मोती बन जाती है यकायक…

नंगे पांव, मैं और मेरी सहेली इन सुनहरे मोतियों की खेती से होते हुए कुछ ढुंढने की कोशिश करते हैं.

IMG_0947.JPG

किसी ना किसी के हाथ में फिर आ ही जाता है यह सुनहरा मोटा सा मोती… हम आवाज देते हैं एक दुसरे को की देखो मेरा मोती ज्यादा सुन्दर है… लेकीन यह भी समझ आता है की अब वो पहले जितना चमक नहीं रहा… तो चलो दुसरा पकडने की कोशिश करते हैं… हम फिर से चल पड़ते हैं…

पता है इसमें कितना काम होता है? पहले तो मोती चुनो, अपने कपडे संभालते हुए घास में बैठो, फिर हलके हांथों से वह खुबसूरत हरा पत्ता ऐसे तोडो की मोती के साथ वह हाथ में आ जाये… बहुत कोशिशों के बाद कामयाब हो जाओ और अपनी सहेली को आवाज दो… अरी ओSSS… या फिर मोती हाथ में लिये दो कदम दोस्त की तरफ आगे बढो… और बताओ उसे की कितना सुन्दर है मेरा मोती…

आज भी जब मेरी ट्रेन गुजरती है बारीश में खिली हलकी धूप में, मुझे दिखता है मेरा बचपन मोती चुनता हुआ…

wp_20150815_17_41_21_pro1.jpg

 

बारीश में सिर्फ हरा नहीं उगता, सफेद भी उगता है काले हरे पहाडों से… गांव से वापिस जब आती थी मैं, मेरी प्यारी बहनें और माँ पापा के साथ, पहाड से गिरते सफेद दूध जैसे पानी को देखकर चिल्लाते थे हम, वो देखो दूध का झरना… मानो उस पानी में हम खुद नाच रहे हो… पहाडों से गिरते ये सफ़ेद झरने आज भी खूब हंसते हैं मेरे बचपन के किस्से सुनकर और खिलखिलाते रहते हैं मेरी हंसी में मिलकर… तरोताजा कर देते है मेरी नन्ही यादों को…

 

उन दिनों मुंबई में गटर का पानी रस्तों पर भर जाता था… आज भी बारीश उसकी याद दिलाती है. हालात तो आज भी वैसे हि है… मेरा मन दौडकर स्कुल के दिनो में पहुंच जाता है, जब ख्याल नहीं आता था की ये पानी कहा से आया है… हमें तो बस इतना ध्यान होता था एक तो स्कुल पहुचना है या छपाक लगाते हुए घर जाना है, बस!… आज कल पता नहीं कैसे गंदगी सबसे पहले दिख जाती है… पर बचपन निकाल लाता है गंदगी से बाहर…

बारीश रुक जाने पर कभी किसी पेड के नीचे खडे रहो तो हवाएं चलती है हमें भिगोने के लिये.. और याद आते है बचपन के वो दिन जब दीदी और छोटी बहन को भिगोने के लिये हम पेड को हिलाया करते थे.. हम खुद बन जाते थे हवा और हमारी हँसी गूंजती रहती थी पेड़ों-पत्तों पर…

बारिश के दिनों में किसान दिखते है हल चलाते हुए खेतों में.. हर किसान मेरे दादा बन जाते है इस बारीश में.. उनके साथ की हुई बैल गाडी की संवारी और बोये हुए कुछ बीज याद आते है… DSCN0784.JPG

इंद्रधनुष क्यो नहीं आया इसलिए मायूस हो जाते थे हम… आज भी खुश हो जाते है इंद्रधनुष को देख उसी बचपने के साथ… क्या क्या नहीं याद दिलाती ये बारीश मुझे,

 

आज भी मैं बारिश बन जाती हूँ मेरी प्यारी यादों के साथ… फुदकती रहती हूँ हरिभरी यादों में खिलखिलाते बचपन के संग…

ना जाने क्यों कभी कभी यह बारीश आंखो में उतर आती है, पता नहीं पर शायद आँखों को उसने अपना घर बना लिया है…!!

 

 

रेस्क्यू ऑपरेशन: माऊचं पिल्लू

सकाळी लवकर जाग आली; असं हल्ली फार क्वचित घडतं. कसं कोण जाणे पण मीटिंग वगैरे असेल तर मात्र गजर व्हायच्या आधीच डोळा उघडतो. त्यादिवशी असंच झालं. पाच मिनिटे आधीच जाग आली. किचनमध्ये काकांची चहाची तयारी चालू होती. दातबित घासून मस्त तयार झाले आणि फक्कडसा चहा घेतला. मीटिंग असल्यामुळे मला भाजी बनवायचे काम नव्हते. (ही माझी आणि माझ्या सासूमधली अॅडजस्टमेंट आहे.. ते असो). तर माझं रुटीन जरा आरामात चालू होतं… त्यात नेचर कॉल आला आणि पेपर वाचत मी नेहमीप्रमाणे टॉयलेटमध्ये बसले. अग्रलेख वाचून झाला, तेवढ्यात म्यां… म्यां… असा आवाज कानावर पडला. हे माऊचे पिल्लूच. त्यांचा माऊ मधला ‘ऊ’ काही दिवसांनी नीट बाहेर पडतो… तोपर्यंत म्यां… म्यां… असंच काहीसं ते ओरडत असतात.

तर, हा आवाज आला आणि मी माझा पेपर गुंडाळून आणि अर्थात, नीट आवरून-बिवरून टॉयलेटमधून बाहेर पडले, तडक माझ्या खिडकीत… पहिल्यांदा लक्ष गेलं समोरच्या पत्र्यावर. माझ्या खिडकीसमोर लग्नाचा हॉल आहे. त्याला एक पत्रा लावलेला आहे. पाऊस नसला तरी इथून अतिरिक्त पाण्याची बरसात बऱ्याचदा पाहायला मिळते. तर या पाऊसवाल्या पत्र्यावर मम्मी माऊ होती. तशी तिला बरेच दिवसांपासून मी तिथे बघत होते. या माऊचं त्या पत्र्यावरून तारेच्या जाळीला पार करून हॉलच्या किचनमध्ये जाणं खरंच धाडसाचं होतं. कसली म्हणून भीती नव्हती तिला. आज ही मम्मी माऊ सतत खाली-वर बघत होती… त्या दिशेने मी ही बघितलं तर तिथे एक कावळोबा होता. आणि त्याचं लक्ष होतं स्कूटरच्या दिशेने… आता तिथे कोण? तर एक दूधवाला दादा…. याची सायकल तर आमच्या बिल्डींगला लागून ठेवली होती, मग तिथे बसून तो काय करत होता? रेस्क्यू ऑपरेशन! माऊच्या पिल्लूचं रेस्क्यू ऑपरेशन… “एका कावळ्यापासून पिल्लाला वाचवणारा दूधवाला…!!”

खाली बसून त्याने एका सोनेरी तपकिरी रंगाच्या पिल्लाला बाहेर काढलं. अगदी आईसारखंच रुपडं होतं त्याचं. जेमतेम दहा सेंटीमीटर लांबी असेल त्याची. मला वाटलं की हा दादा त्याला मम्मीजवळ सोडेल, पण कावळ्याने उचललं तर? तेवढ्यात दादाने त्याला आपल्या पिशवीत दूधाच्या किटलीच्या झाकणावर ठेवलं. सायकलवर बसला, ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवली आणि पुढच्या बिल्डींगकडे गेला. तो ज्या दिशेने गेला तिकडे पुढे रस्ता नाही. म्हणजे तो परत येणार हे मला माहितीच होतं. मला उत्सुकता होती तो त्या पिल्लाला घरी नेणार की सोडून देणार?, याची. हेच विचारायला मी खिडकीत बसून राहिले. पिल्लूवर टपलेला कावळा स्कूटरपर्यंत गेला आणि काहीच न मिळाल्यामुळे पंख हलवत उडून गेला. मम्मी माऊ अजुनी स्कूटरकडेच बघत अस्वस्थ उभी होती. तिने एकदाच छोटासा म्याऊ केला, नंतर फक्त नजरेने शोध चालू होता.

सात-आठ मिनिटांनी सायकलची घंटी वाजली… “आला!” ती घंटी आपल्यासाठीच वाजली होती अशा रितीने मम्मी माऊ आता त्याच्याकडे बघत होती. दादा पण सायकलवरून उतरला. तो पिशवीत हात घालून पिल्लू काढणार तेवढ्यात मी म्हटलंच, “पिल्लू सोडून देणार?” त्यावर तो हो म्हटला. मला फार काळजी वाटली म्हणून मी म्हटले, “अरे कावळा येईल ना परत!” “त्याची आई आहे ना.” तो उत्तरला… आणि हे बोलताना त्याने मम्मी माऊकडे बघत त्या गोंडस पिल्लूला जमिनीवर ठेवलं. सायकलवर बसला आणि निघून गेला. तेवढ्यात मम्मी माऊ भिंतीच्या उंचीचा विचार न करता कसरत करत खाली आली. आपल्या पिल्लूची मान तिने अलगद तोंडात धरली आणि सुरक्षित जागेच्या शोधात लगेच पसार झाली. ती दिसेनाशी होईपर्यंत मी माझी खिडकी काही सोडली नाही. ते पिल्लू खाली आलंच कसं हे कोडं काही मला सुटलं नाही… पण दूधवाला दादा आणि मम्मी माऊने केलेलं ‘पिल्लूचं रेस्क्यू ऑपरेशन’ मात्र जसच्या तसं लक्षात राहिलं. मोर्निंग फीस्ट होती माझ्यासाठी ती.

विश्वरुप

जग बघण्यासाठी जग फिरावं लागतं असं काही नाही; असं मला वाटतं. वाटत राहतं असं अधून मधून… त्यातलं एक कारण माझी खिडकी…. जगभर जे काही चालतं त्याचं खुजं का होईना पण प्रारूप माझ्या खिडकीतून दिसतं ‘च’…. आता हिला खिडकी म्हणावं का? तर तो ज्याचा  त्याचा प्रश्न! पहिल्या मजल्याच्या बाल्कनीचा पूर्ण भिंतीच्या उंचीच्या अर्धा, वरच्या बाजूने खुला असलेला भाग आणि त्याला पुढे-मागे करता येतील असे दरवाजे- शटर्स!

तर, बाल्कनीत बसून या खिडकीतून जे काही दिसते, ते सर्व या जगात घडत असते असे मला बापुडीला वाटते… हां आता प्रत्येकाचे विश्व वेगळे हे आलेच…

माझ्या विश्वात लोक आहेत, काही पाळलेले तर काही न पाळलेले पाळीव प्राणी आहेत, मस्त मोठी झाडे आहेत, बागडणारे पक्षी आहेत, कीटक आहेत, पर्यावरणाचा भाग असलेले पण प्रदूषण करणारे घटकही आहेत… एकूणच सगळे घटक एकमेकांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित आहेत… आणि जगात संबंध यायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीशी असा काही नियम नाही… त्यामुळे माझ्या जगात हे-हे असे घटक आहेत…. त्यांच्या गोष्टी घडत राहतात आणि माझे डोळे जमेल तसे ते टिपतात… दृश्य जगाला माझा मेंदू विचारांमध्ये बदलतो आणि मग खरे तर त्या शब्दरूपी गोष्टी बनतात…

असे, या खिडकीतून दिसणारे विश्वरूप आहे. मला दिसणारे हे विश्व इतरांसोबत शेअर करायचे असेल तर शब्दांशिवाय कसे मांडणार? म्हणून हा लेखन प्रपंच….

भेटू लवकरच माझ्या जगातल्या घडामोडींसकट……!

कण कण में कविता बसती है….

इस पृथ्वी के, कण कण में कविता बसती है..
गानों की लहर सी उठती है
मौजोंकी रवानी गूंजती है…
चिड़िया डाल पर चहकती है
बिजली सी कोई कडकती है…
मोर के पैर भी थिरकते है
नदिया भी बहते हंसती है…
पत्तों की गलिया खुसफुसाती है
नन्हीं सी गुडिया खिलखिलाती है…
हवा भी अक्सर गाती है
बारिश से ताल ये मिलाती है….
सब सुन सुन हो जाता है
ख़ामोशी की आवाजें आती है
चुपचापसी दुनिया सोती है
कोई लोरी धरती सुनाती है….
पृथ्वी नेहमीच गाणं गुणगुणत असते. ऐकायला फक्त कान द्यावे लागतात. अंतर्बाह्य कसं टवटवीत वाटायला लागतं. पावसात हळूच डोकं वर काढणाऱ्या गवताच्या पात्यासारखं… ते तर झुलू देखील लागतं या गाण्यासोबत… वाहवत जातं आपलं मन याच ‘नादात’… आणि आपणही होऊन जातो कवितेचे शब्द… पृथ्वीच्या गाण्याचे बोल….